Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pune crime : दरोडेखोरांनी दागिने बॅगेत भरण्यास सुरवात केली अन् अवघ्या पाचच मिनिटांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 15:14

pune crime : पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. हीच नामी संधी समजून चोर, दरोडेखोर देखील चोरीसाठी सज्ज झाले आहेत. मंचर (जि. पुणे) येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. एकूण सात जणांनी मिळून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. चोरी करण्याच्या हेतूने सोने-चांदीचे दागिने बॅगमध्ये भरण्यास सुरवात केली. परंतु अवघ्या पाच मिनिटांत पोलीस आले अन् चोरी उघडकीस आली.

सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. काही हत्यारांचा वापर करत त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला.

दरम्यान, पोलिसांना फोन आल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरट्यांकडून कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

या घटनेते दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे का? हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या टोळीतील दरोडेखोर अट्टल आहे. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची शक्यता उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केली.

 

अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव बाळू रोकडे, गणेश रामचंद्र टोके, अजय सखाराम भिसे, ग्यानसिंग भोला वर्मा, मोहम्मद अरमान दर्जी यांचा समावेश आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

एकाच कुटुंबातील ६ जणांना झोपेत जिवंत जाळण्याचा प्रयत्न; बीडमधील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp