Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 September 2026, 12:43

धाराशिव : कला केंद्रातील वादातून गर्भवती नर्तिका पिंकी काटकर हिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात धाराशिव पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. पिंकीचा मृतदेह धाराशिवपासून सुमारे 275 किलोमीटर अंतरावर धुळे जिल्ह्यातील जंगलात नेऊन जाळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी सर्फराज अलीम मोमीन याच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस नोंदीत आहे.

सर्फराजविरोधात एका महिलेने केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित महिला विवाहित असून तिला 2 मुले आहेत. 2023 मध्ये पुण्यात कामासाठी आल्यानंतर तिची एका महिलेशी ओळख झाली. अधिक पैसे मिळतील असे सांगून तिला धाराशिवमधील गौरी कला केंद्रात नेण्यात आल्याचा आरोप आहे.

तेथे सर्फराजने वेगळ्या नावाने तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओचा वापर करून लग्नासाठी दबाव आणल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. एका विवाहित महिलेला खोटे नाव सांगून बळजबरीने लग्न करून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. पुढे तिला वाशीम जिल्ह्यातील एका धार्मिक व्यक्तीकडे नेऊन धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. विरोध केल्यावर धमक्या देण्यात आल्या आणि तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

इच्छेविरोधात नमाज व कलमा वाचून तिला धर्मातर करायला भाग पाडून हातावर मुस्लिम धर्माचा टॅटू काढण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच तिला जबरदस्तीने बैलाचे मटण खायला दिल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर तिला वेगवेगळ्या 2 ते 3 कला केंद्रांमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली आणि तेथे नृत्याचे काम करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप महिलेने केला आहे.

 

तक्रारीनुसार,  महिलेला विविध ठिकाणच्या कला केंद्रांमध्ये नेऊन काम करण्यास भाग पाडण्यात आले. बीड, संभाजीनगर, वाशीम, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचेही आरोप तिने केला आहे. एका ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला पुन्हा पकडून आणल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील जगदंबा कला केंद्रात घेऊन गेला. तेथे तो पार्टी मालक म्हणून काम पाहत होता. या ठिकाणी महिलेला मारहाण करून काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. तसेच, ‘मी मुली आणून देतो, त्यांच्याकडून काम करून घे’, असे तो तेथील व्यक्तींना सांगत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महिलेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला पुन्हा पकडून कला केंद्रात आणण्यात आल्याचा आरोप आहे. काही काळानंतर जगदंबा कला केंद्र बंद झाल्यावर आरोपीने तिला महाकाली कला केंद्रात नेले. मी मुली आणुन देतो, त्या मुलींकडून धंदा करून घे, असेही सांगितले. तेथे त्याने हिंदू नावाचा वापर करून पार्टी सुरू केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

महिलेने पुन्हा तेथून निसटण्याचा प्रयत्न केला आणि लातूर गाठले. मात्र, तिच्या मोबाईलच्या लोकेशनच्या माध्यमातून आरोपीने तिचा शोध घेतला. त्यानंतर तिला पकडून मारहाण केल्याचा आणि पुन्हा महाकाली कला केंद्रात आणल्याचा आरोप आहे.

याच काळात आरोपीने तलवारीने हल्ला केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, या हल्ल्यात संबंधित महिलेला न लागता तिच्या मैत्रिणीला तलवारीचा वार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 115(2), 351(2), 352, 64 आणि 64(2)(m) अंतर्गत झिरो गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा धाराशिव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, हत्या प्रकरणाचा तपासही सुरू असून आरोपी सर्फराजविरोधातील इतर प्रकरणांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, दिलीप दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18

मुंबईत मृत्यूनंतरही 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह! अमेरिकेतल्या टेक्नोलॉजीनं ‘भविष्यात पुन्हा जिवंत होईल’ या आशेने कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

Wednesday, 30 September 2026, 12:02
Next Post

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, दिलीप दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp