Pune Crime | पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, गोखलेनगर परिसरातून चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहिणी घाडगे (वय ३२, रा. गोखलेनगर) यांनी तक्रार दिली आहे.
मध्यरात्री तीनच्या सुमारास घडला प्रकार…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार या वनरक्षक पदावर वन विभागात नोकरीस आहेत. दरम्यान, गोखलेनगरच्या वनविभागाच्या भिंतीशेजारी तीन चंदनाची झाडे होती.
त्यावर पाळत ठेवून चंदन चोरट्यांनी ५० हजाराची तीनही झाडे मध्यरात्री तीनच्या सुमारास कापून चोरून नेली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी पाहणीकरून पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यानूसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
अरण्येश्वर भागातील काळूबाई मंदिरातून तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस
प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी; गल्ल्यातील रोकडसह मोबाइल लांबविला
शिरूर पोलिसांचा शेतकऱ्यांना दिलासा; चोरीस गेलेले १७ कृषी पंप केले जप्त, तर चार जणांना ठोकल्या बेड्या