(Pune Crime) पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणात सायबर चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. गेल्या काही वर्षात सायबर चोरांकडून सर्वसामान्य ग्राहकांना लुटण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. अशातच OLX या अॅपवरून साहित्य खरेदी -विक्री करण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात सायबर चोरीच्या घटना…
आंबेगाव वडगावशेरी येथील 38 वर्षीय व्यक्तीने फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर चोरट्याने फिर्यादी व इतर व्यक्तींना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. त्यानंतर ओएलएक्सद्वारे साहित्य खरेदी विक्री करण्याच्या बहाण्याने फिर्यादींच्या खात्यातून 46 हजार 300 रुपये तर इतर व्यक्तींच्या खात्यातून अशाच प्रकारे 10 लाख 32 हजार रुपये असे एकूण 10 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.