Pune Crime पुणे: पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तू रामबाबू राय (वय ३० ,रा. कव्वा चौक, जोरपूर, जि. समस्तीपूर, बिहार), राकेशकुमार रामनाथ दास (वय १९, रा. खुसरुपूर, जि. पाटणा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime ) पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्सल विभागाजवळ दोघे जण थांबले असून ते गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली.
१२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून राय आणि दास यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला.(Pune Crime ) दोघांकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा, मोबाइल संच, पिशवी असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : जावयाने सासू व त्यांच्या मित्राचे फोटो केले मार्फ; नग्न फोटो बनवून पाठवले नातेवाईकांना
Pune Crime : खळबळजनक! सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा
Pune Crime : जनरेटर चोरणाऱ्या तीन भामट्यास गुन्हे शाखेने केली अटक