Pune Crime पुणे : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील ८० हजारांचा सुवर्णहार दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना धनकवडी (Pune Crime) भागातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग…
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहे. ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. त्यानंतर फिर्यादी यांना काही समजायच्या आत चोरटा महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला. चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता.
याप्रकणी महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अद्यात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुण्यात लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे गंठण लुटले
Pune Crime : पुण्यात OLX वरील खरेदी-विक्रीच्या बहाण्याने तब्बल साडेदहा लाखाची फसवणूक