पुणे : व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्लने एका पुणेकराची कोट्यावधींची फसवणूक केली. तब्बल 57 लाख 58 हजार 197 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी पौंड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत अशी त्यांची नावे आहेत. सध्या ते 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
जितेंद्र भाखाडा आणि त्यांच्या पत्नीची कंसलटंसी फर्म आहे. जितेंद्र भाखाडा यांची प्रिक्वेल सिस्टम्स कंसलटंसी फर्म आहे. ऑनलाईन आणि फोनच्या मध्यमातून ते फर्म चालवत होते. त्यासोबतच त्यांची पत्नी नेहा हिची नमस्या प्रिंसीजन्स नावाची कंसलटंसी फर्म असून दोघे नवरा बायको हे फर्म चालवतात. मात्र जितेंद्र भाखाडा यांना तांत्रिकशेती उदयोगात जायचे होते. म्हणून त्यांनी सोशल मीडियाचा विविध ठिकाणी त्याबाबतची माहिती गोळा केली. त्यावेळी त्यांना फेसबुकवर डेहराडून या ठिकाणी मशरूमच्या तांत्रिक शेती बद्दल माहिती मिळाली. त्यांनी शकुंतला रॉय यांच्याशी फोनवर चर्चाकरून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना 5 ते 6 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डेहराडून मधील मोथारावाला याठिकाणी बोलविले.
जितेंद्र भाखाडा जानेवारी 2019 मध्ये मोधारावाला डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी गेले. तेथे त्यांना शकुंतला रॉय हीची बहीण दिव्या रावत भेटली. तीने मशरूमच्या संपूर्ण तांत्रिकशेतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर फिर्यादी हे पुण्यात आले. दिव्या रावत हिच्याशी ओळख झाल्याने तिच्या सोम्या फुडस प्रा. लि. तसेच कोरडीसेफ फिटनेस, द माउटन मशरूम या फर्मबाबत घरूनच त्यांनी मदत केली. तेव्हा दिव्या रावत यांनी ‘आप काम अच्छा करते हो, आप मेरे मिशन के लीये कंसलटन्सीका काम करोगे क्या? और उसके बाद में मैं तुम्हे पार्टनरशीप में लुंगी’ असे म्हणताच फिर्यादी यांनी त्याला होकार दिला. आणि या कालावधीत जवळपास 57,58,197 रूपये दिले. ते पैसे परत न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याचे जितेंद्र भाखाडा यांना समजले. तेव्हा त्यांनी तक्रार दाखल केली.
याबाबत जितेंद्र भाखाडा यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत उत्तराखंड गाठलं आणि कारवाई केली. 2023 साली पुण्यातून पथक उत्तराखंडला गेले आणि दिव्या रावत व राजपाल रावत याला 9 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.