पुणे: पुण्याच्या मावळ तालुक्यातील चावसर गावच्या हद्दीत जमिनीमध्ये मृतदेह अर्धवट पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 3 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चावसर शिलिंब रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून मृतदेह अर्धवट पुरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून मृताचे अंदाजे 35 ते 40 वर्ष असेल असा अंदाज आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.








