Pune Crime News | लोणी काळभोर, (पुणे) : उसने घेतलेल्या पैशाची वारंवार मागणी करीत असल्याच्या कारणावरून दोघांनी आपल्याच मित्राचा खून करून दृषम सिनेमा स्टाईलने सदर मयतीची विल्हेवाट लावल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय सुनिल होळकर (वय-३० रा. अभिलाशा बिल्डींग, बी-विंग शनिनगर, आंबेगाव, पुणे), समीर मेहमुद शेख, (वय- ४३ वर्षे रा. आण्णाभाऊ साठे हसींग सोसायटी मिलींदनगर मज्जीद समोर पिंपरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दत्तात्रय शिवराम पिलाणे (वय – ३२, रा. शनिनगर जांभुळवाडी महाड रोडचे रोड आंबेगाव खु. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता. १७) वारखंड (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीत एक अनोळखी तरुणाची बॉडी मिळाल्याची माहिती भोर पोलिसांना गावचे पोलीस पाटील सुनील दिघे यांनी दिली होती. भोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी जावुन बॉडीची पाहणी करून अकस्मात मयत म्हणून पंचनामा करून नोंद करण्यात आली होती.
सदर घटनेचा तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव करीत होते. सदर मयत बॉडी कुजलेली असल्याने सदर मयताची ओळख पटली नव्हती. मयताचे नातेवाईक यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून मयताचे फोटो व्हायरल केले होते. त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्यात शिवराम राघु पिलाणे (वय – ६५) यांनी त्यांचा मुलगा दत्तात्रय पिलाणे हा शुक्रवार (ता. १०) पासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
पाच ते सहा लाख रुपये वर्षभरात उसने घेतले…
पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने दत्ताय पिलाणे याचा मित्र अक्षय होळकर तसेच मित्र समीर शेख यांचे कडे तांत्रिक व पोलीस कौशल्यपूर्ण अधिक तपास करून सदर व्यक्तीच्याकडे संशय बळावल्याने भोर पोलीस स्टेशनचे तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे तपास पथकाने सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दत्तात्रय पिलाणे हा माझा मित्र असुन त्याच्याकडुन मी पाच ते सहा लाख रुपये वर्षभरात घेतले होते. त्या पैशाची तो मला वारंवार मागणी करून त्रास देत होता.
या कारणावरुन त्याचा समीर शेख याचे मदतीने पिलाणे यांचे गळ्गावर व पोटावर चाकुने वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला. तसेच दत्तात्रय पिलाणे याची अंगावर कपडे नसलेली मयत बाँडी ईको गाडीमध्ये ठेवुन भोर ते महाड रोडणे वारखंड गावचे हद्दीत झाडा-झुडपात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फेकून दिली. तसेच खून केल्यानंतर मयताचे व त्यांचे अंगावरील कपडे जाळून पुरावा नष्ट केला.
सदरची कामगिरी भोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस नाईक बाळासाहेब खडके, मंगेश भगत सर्व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण तसेच पोलीस हवालदार उध्दव गायकवाड,
पोलीस हवालदार विकास लगस, पोलीस हवालदार अविनाश निगडे, पोलीस हवालदार यशवंत शिंदे, पोलीस नाईक निलेश सटाले, दत्तात्रय खेगरे, शौकत शेख, पोकों, सागर झेंडे, महिला पोलीस हवालदार वर्षा भोसले व महिला पोका प्रियंका जगताप सर्व भोर पोलीस स्टेशन, पोलीस पाटील श्री. सुनिल दिये एस. एन. गायकवाड पोलीस हवादार सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही
Pune Crime | पुणे : मोटारचालकाची मुजोरी; पीएमपी चालकाला केली मारहाण