पुणे : येरवड्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमन्यास्यातून एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटूंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (25 वर्ष, रा. जयप्रकाश नगर येरवडा ) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराच नाव आहे. असून याप्रकरणी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य (44 वर्ष), स्वप्निल प्रवीण आचार्य (28 वर्ष) तसेच रवी किरण रामचंद्र आचार्य (35 वर्ष, तिघेही रा. जयप्रका नगर, येरवडा ) यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसापूर्वीच तो जेल मधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली होती. आचार्य कुटुंबियांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरु केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुहास हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असता, त्याला गाठून या तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात व शरीरावर वार केले. या हल्ल्यात सुधीर याचा जागीच मृत्यू झाला आहे.