(Pune Crime News ) पुणे : दोन वर्षापुर्वीच्या वादाला बदल्या घेण्यासाठी टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील राजीव गांधीनगर (Rajiv Gandhinagar )परिसरात घडला आहे. तरुणावर लोखंडी रॉड व दगडाने छातीवर डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या पायाचे हाड मोडले गेले आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
आशिष उर्फ चिक्या राजेश गायकवाड (वय २९) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात वसंत गालफाडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटेनेबाबत अधिक माहिती अशी की, धुलीवंदनच्यादिवशी सायंकाळी ही घटना राजीव गांधीनगर परिसरात घडली आहे. तक्रारदार व वसंत गालफाडे यांच्या कुटूंबात दोन वर्षांपुर्वी वाद झाले होते. त्यानतंर हे वाद मिटले होते. पण, त्या वादातून धुलीवंदनादिवशी वसंत याने इतर साथीदारांना घेऊन तक्रारदार हे गेम खेळत बसलेले असताना अचानक येऊन हल्ला केला. त्याला शिवीगाळकरून बेदम मारहाण केली. छातीवर व डोक्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डावा पायाचे हाड मोडून तो गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.