(Pune Crime News ) पुणे : दुसऱ्या पतीकडून ( wife-by-second )विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातून ( pune )समोर आला आहे. याशिवाय अश्लील व्हिडीओ (video) काढून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी विवाहितेला देण्यात आली आहे. दरम्यान पतीच्या या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. सदर महिलेचा दुसरा विवाह झाला आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात पतीविरूध्द फिर्याद दाखल…
याप्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात पतीविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून , शुक्रवार पेठेत राहणाऱ्या दुसऱ्या पतीवर बलात्कार, मारहाण तसेच अनैसर्गिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहितेचा दुसरा विवाह झालेला आहे. विवाह झाल्यापासून पती वारंवार कौटुंबिक तसेच किरकोळ कारणावरून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत होता. तसेच, तो विवाहितेशी अनैसर्गिक अत्याचार करत होता. दरम्यान पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
अत्याचारग्रस्त मुलीवर खुनी हल्ला; एपीआयसह पीएसआय, कॉन्स्टेबल तडकाफडकी निलंबित; बार्शीतील प्रकार