पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली म्हणत म्हणत फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचीही हत्या करण्यात आली. त्या घटनेनंतर पुणेकर भयभीत झाले असताना. आता मंगळवारी (दि. 03) गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुनील सरोदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सरोदे हा डायस प्लॉट परिसरात राहतो. जामीनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून हत्यासत्र सुरुच आहे. दररोज गुन्हेगारी घटना घडत असलेल्या समोर येत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.