पुणे: पुण्यातील काळेपडळ (Pune Crime) पोलीस ठाण्याच्या (Pune News) हद्दीत एका मुलीवर 39 वर्षीय नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब पंढरी अंबुरे (वय 39) हा पीडित मुलीच्या ओळखीचा असून नेहमी त्यांच्या घरी ये-जा करत असे.

घटनेच्या तपासणीत असे समोर आले आहे की, पीडित मुलीचे वडील हयात नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने दोन दिवसांपूर्वी पीडितेच्या घरी येऊन तिला घरात एकटी असताना छेडछाड केली. आरोपीने मुलीच्या छातीसह तिच्या नको त्या अवयवांवर हात फिरवून विनयभंग केला.
या घटनेबाबत मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर, पीडितेच्या आईने आरोपीला जाब विचारला. यावर आरोपीने धमकी देत म्हटले की, “जर कोणाला सांगितलं तर सगळ्यांना ठार मारीन.” या धोक्यामुळे मुली आणि तिच्या आईला अत्यंत त्रास झाला. पीडितेच्या आईने तत्काळ काळेपडळ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धडक देत आरोपीला ताब्यात घेतला असून, त्याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीसावरील तात्काळ कारवाई करून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा सामाजिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी तपासली जात असून, पीडितेच्या सुरक्षेसाठी तसेच आरोपीच्या कृत्यांबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीती निर्माण केली आहे. विशेषत: अशा प्रकरणांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील जागरूकतेसाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्परतेने कार्य करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. काळेपडळ पोलिसांचा याप्रकरणी पुढील तपास चालू असून, आरोपीविरोधात अधिक तपास, साक्षीदारांची माहिती गोळा करणे आणि न्यायालयीन कारवाईसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या घटनांबाबत त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत.







