पुणे : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स सोशल मीडियावर टाकू नका अशा सक्त सुचना गुन्हेगारांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील रिल्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांनी थेट कारवाईला सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 250 हून अधिक इन्स्टाग्राम अकाऊंट आयडेंटीफाय केले असून 60 हून अधिक अकाऊंटवरील रिल्स व कंटेंट डिलीट करून ते डिअॅक्टीव्ह केले आहेत.
त्याशिवाय, गुन्हेगारांनी आपले राजकीय कनेक्शन असल्याची माहितीही अप्रत्यक्षपणे पोलिसांना दिली होती. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील अकाऊंट मॉनिटर करण्यात येत आहेत. गुन्हेगारांच्या रिल्स टाकणाऱ्या अकाऊंटवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहेत.
पोलिसांकडून इंन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या अकाऊंटची पडताळणी केली जात आहे. आत्तापर्यंत अडीशचे हून अधिक अकाऊंट पोलिसांनी शोधून काढले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गुन्हेगारांकडून गुन्हेगारीचे सोशल मिडीयावर उदात्तीकरण करणे चुकीचे असून मी यापुढे कोणतीही रिल्स टाकणार नाही, आपण देखील टाकू नका अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून घेतले जात आहेत. यासोबतच आणखी जवळपास दीडशे अकाऊंटची माहिती घेण्यात येत आहे.