Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; अटी व शर्ती लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 22:28

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले युट्युबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्या न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या हमीदारावर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी पुण्यातील सारिका कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंडित यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह तसेच समाजात गैरसमज निर्माण करणारे व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान संतोष पंडित यांच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांचा हेतुपुरस्सर गैरवापर करण्याचा उद्देश नव्हता, तसेच संबंधित महिलेच्या लज्जेचा अनादर करण्याचा आरोपीचा हेतू नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दाखल गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी लक्षात घेता आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले.

मात्र, सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीकडून सोशल मीडियावर वारंवार अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. आरोपीचे सोशल मीडिया अकाऊंट अद्याप सुरू असल्याने त्यांना जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. तसेच प्रकरणातील सीडीआर अहवाल आणि काही तांत्रिक बाबींचा तपास अद्याप बाकी असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी संतोष पंडित यांना जामीन मंजूर केला. मात्र, जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. आरोपीने फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल, 3 काडतुसे! बारामतीत तरुणाला अटक; 2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 23 October 2026, 10:41

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Friday, 23 October 2026, 10:25

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

Friday, 23 October 2026, 10:19

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Friday, 23 October 2026, 10:13
Next Post

शुभमन गिलकडे कर्णधारपद तर रोहित-विराटचा सहभाग; आगामी वनडे आणि टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp