Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमच्या नादी लागला तर जीवे ठार मारून टाकीन; यवतमध्ये फॉर्च्युनरची तोडफोड करत कुटुंबाला कोयत्याने जीवे मारण्याची धमकी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 11 April 2026, 11:04

Yavat Crime : यवत, ता. 11 : मागील काही दिवसांपूर्वी आपल्या भावावर आणि पत्नीवर झालेल्या पोलीस कारवाईचा राग मनात धरून सराईत गुंडाने आपल्या साथीदारांसह फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 08) रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास यवत हद्दीतील मलभारे वस्ती येथे ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सदाशिव जानकुराम मलभारे (वय-53, रा. मलभारे वस्ती, यवत, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम बाळू लकडे (रा. मानकोबावाडा, यवत, ता. दौंड) आणि अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव मलभारे यांचा मुलगा विक्रम मलभारे हा कुटुंबासह लोणी काळभोर येथील नातेवाईकांकडे जेवणासाठी गेला होता. बुधवारी (ता. 08) रात्री 10 वाजता सर्वजण घरी परतले आणि त्यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी (क्र. MH 14 EA 7575) घरासमोर उभी केली होती.

रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आरडाओरडा ऐकू आल्याने मलभारे पिता-पुत्र बाहेर आले. तेव्हा तिथे शुभम लकडे हा आपल्या दोन साथीदारांसह उभा होता. शुभम आणि त्याच्या एका साथीदाराच्या हातात लोखंडी कोयते होते. त्यांनी आरडाओरडा करत मलभारे यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. जेव्हा सदाशिव मलभारे आणि त्यांचा मुलगा मदतीसाठी ओरडले, तेव्हा शुभम लकडे हा कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला. जीवाच्या भीतीने मलभारे कुटुंबीयांनी घरात पळून जाऊन दरवाजा बंद करून घेतला.

 

यावेळी आरोपी शुभम लकडे याने घराच्या ओट्यावर कोयता जोरजोरात मारून परिसरात दहशत निर्माण केली. “माझ्या भावावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल केल्याचा बदला घेईन, आमच्या नादी लागला तर जीवे ठार मारून टाकीन,” अशी धमकी त्याने भरवस्तीत दिली. त्यानंतर तो आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून पसार झाला.

घटनेनंतर मलभारे यांनी तातडीने ‘डायल 112’ वर फोन करून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. सुरुवातीला दहशतीमुळे हे कुटुंब तक्रार देण्यास पुढे आले नव्हते, मात्र धाडस करून त्यांनी 10 एप्रिल रोजी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदाशिव मलभारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम बाळू लकडे आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेतलवाड करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35
Next Post
Ashok Kharat

Ashok Kharat : समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण: रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस; 5 दिवसांत शिर्डीत हजर राहण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp