Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन येथील अपघातात जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 March 2026, 14:36

लोणी काळभोर, ता. 12 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना एका कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरातील प्यासा हॉटेलसमोर 27 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे . या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू आहे.

गणेश छगन अल्हाट (रा. लोणी काळभोर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अभिषेक राजेंद्र क्षिरसागर (वय 22, व्यवसाय – सेल्समेन, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अनोळखी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक क्षिरसागर ही 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी कामावर गेले होते. त्यानंतर त्यांचे मामा गणेश अल्हाट हेही सकाळी सेंट्रींगच्या कामासाठी घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कामाच्या कारणाने ते कधी कधी दोन दिवस बाहेर राहत असल्याने कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, 1 मार्च रोजी सायंकाळी फिर्यादीची आजी सिंधू रणदिवे या भाजी आणण्यासाठी प्यासा हॉटेल परिसरात गेल्या असता, ओळखीच्या महिलेने 27 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी गणेश अल्हाट यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. ही बाब समजताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.

त्यानंतर अभिषेक क्षिरसागर यांनी विश्वराज हॉस्पिटल येथे चौकशी केली असता, गणेश अल्हाट यांना गंभीर जखमी अवस्थेत तेथून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजले. ससून रुग्णालयात ते आयसीयू वॉर्ड क्रमांक 7 मध्ये दाखल होते. अपघातात त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर, पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत तसेच डोक्याला मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस उपचार सुरू असतानाच 4 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकाजवळील कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अज्ञात वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत गणेश अल्हाट यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर चालकाने जखमी व्यक्तीस कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125 (ब), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 119, 134, 177 व 184 अन्वये लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46

Pune API Bribe Case : बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजाराच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात!

Thursday, 14 May 2026, 11:44
Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 14 May 2026, 11:22

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Next Post

Loni Kalbhor: रामदरा डोंगर पेटला! वनव्याने हजारो झाडे राख; पशुपक्ष्यांचा मोठा बळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.