Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 May 2026, 11:01

BIG NEWS  पुणे, ता. 14 : देशातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जनगणना 2027 मोहिमेसाठी पुणे नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने आता नागरिकांच्या दैनंदिन दस्त नोंदणी सेवांवर परिणाम होणार आहे. विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक संवर्गातील उपलब्ध मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर जनगणना कामात गुंतल्याने तब्बल 15 सह दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. BIG NEWS

दि. 15 मे ते 16 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रक्रियेचे कामकाज पार पडणार असून, यासाठी कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कार्यालयात कार्यरत असलेल्या सुमारे 50 कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी जनगणना मोहिमेत गुंतल्याने नोंदणी विभागातील मनुष्यबळावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

कोणती कार्यालये राहणार बंद?
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 1, 2, 4, 6, 7, 8, 9, 12, 14, 16, 17, 18, 22, 24 आणि 26 ही एकूण 15 कार्यालये या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहेत. BIG NEWS

 

ही कार्यालये सुरू राहणार
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 3, 5, 10, 11, 13, 15, 19, 20 (अर्थडेड), 21, 23, 25 आणि 27 ही 12 कार्यालये मर्यादित मनुष्यबळासह सुरू राहणार आहेत. दरम्यान, सह जिल्हा निबंधक कार्यालयात केवळ आवक-जावक आणि परतावा अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू राहील. इतर बहुतांश सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहेत. BIG NEWS

दस्त नोंदणीसाठी नागरिकांची चिंता वाढली
मे-जून हा कालावधी मालमत्ता व्यवहारांसाठी महत्त्वाचा मानला जातो. अशा वेळी अनेक कार्यालये बंद राहणार असल्याने सुरू असलेल्या कार्यालयांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी दस्त नोंदणी, मालमत्ता व्यवहार आणि कर्जप्रकरणांमध्ये विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरू असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, सेवा वितरणात काही प्रमाणात विलंब होऊ शकतो, असेही स्पष्ट केले आहे.

“जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य” 
प्रशासनाकडून सांगण्यात आले की, जनगणना हे देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून सर्व नागरिक, दस्त लेखक आणि संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे. BIG NEWS

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post
Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.