Shirur News : न्हावरे, (पुणे) : न्हावरे-निर्वी रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी (ता. 13) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. ऋतुजा विनय शिळीमकर (वय 29, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत ऋतुजा शिळीमकर यांचे चुलते राजेंद्र बहिरट यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार न्हावरे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याची माहिती न्हावरे पोलिसांनी दिली. Shirur News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिळीमकर या न्हावरे येथील एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी (ता.१३) सायंकाळी बँकेची सुट्टी झाल्यानंतर त्या आपल्या दुचाकीवरून मांडवगण फराटा येथील घरी जात होत्या. Shirur News
न्हावरे-निर्वी रस्त्यावर निर्वी गावाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेतील ऋतुजा यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र,अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. Shirur News

ऋतुजा शिळीमकर यांचे माहेर न्हावरे गाव असून,त्यांचे वडील अनिल(बंडू)बहिरट हे न्हावरे येथील परिचित व्यावसायिक आहेत.अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावाच्या ऋतुजा यांच्या अकाली निधनाने न्हावरे,मांडवगण फराटा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,परिसरात शोककळा पसरली आहे. Shirur News








