Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाह निमंत्रण की सायबर सापळा? लिंक उघडली आणि 5 लाख 30 हजार खात्यातून गायब; व्यावसायिकाच्या खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 June 2026, 20:24

पुणे: अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेली विवाह निमंत्रण पत्रिकेची लिंक उघडल्यामुळे पुण्यातील एका व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सायबर चोरट्यांनी लिंकच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख 30 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 56 वर्षीय व्यावसायिक असून ते बंडगार्डन रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहतात. गेल्या महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाची लिंक पाठविण्यात आली होती. ती लिंक त्यांनी उघडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवर ‘रघुनंदन कुमार ॲमेझॉन फ्रॉड’ असा संदेश प्राप्त झाला.

यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एक ओटीपी पाठविला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख 30 हजार रुपयांचे ऑनलाइन व्यवहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासात ही रक्कम एका बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, संदेश किंवा एपीके फाईल्स उघडू नयेत, तसेच कोणत्याही परिस्थितीत ओटीपी किंवा बँकिंगसंबंधी माहिती इतरांना देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद संदेश मिळाल्यास त्वरित संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

परदेशात बसून भारतीयांना लुटणारा 'सायबर किंग' गजाआड; पिंपरी पोलिसांच्या धाडसी कामगिरीने आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.