Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“दादा गेले त्यामळे यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करणार नाही” सुप्रिया सुळेंच वक्तव्य; नेमकं काय म्हणाल्या?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 October 2026, 19:30

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, या मागणीचा अद्याप विचार झालेला नसल्याचा आरोप सुळे यांनी केला. सरकारने केवळ पाच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून, शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सरकार असंवेदनशील असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची बैठक झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची योजना राबवली जाते. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही ‘नमो किसान योजना’ सुरू केली आहे. मात्र, या योजनेचे दोन हप्ते मिळणे अपेक्षित असतानाही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीत सरकारी खर्चावरूनही सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले. एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना वृक्षलागवडीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नवीन वाहनांच्या खरेदीवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना पुरेशी मदत देण्याऐवजी इतर बाबींवर खर्च केला जात असल्याने सरकारची भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्या म्हणाल्या.

 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत सुळे यांनी यंदा पवार कुटुंबीयांचा पारंपरिक दिवाळी पाडवा साजरा केला जाणार नसल्याचे सांगितले. शेतकरी संकटात असताना सण साजरा करणे योग्य वाटत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळेही यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

खडकवासला मतदारसंघातील मतदारसंख्येतील बदलांवरही सुळे यांनी चिंता व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी खडकवासला मतदारसंघात सुमारे ५० हजार मतदारांची वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, ‘एसआयआर’ प्रक्रियेनंतर मतदारांची संख्या पाच लाखांवरून अडीच लाखांपर्यंत कमी होत असेल, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मतदारयादीतून एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे कशी वगळली जाऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करत या प्रक्रियेतील बदलांची पारदर्शकपणे तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53

मोठी बातमी! बळीराजांसाठी भाजपच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःच १ वर्षांचं मानधन

Sunday, 18 October 2026, 19:40
Next Post

पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार १५ हजार रुपये; आत्ताच करा 'हे' काम अन् मिळवा लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp