Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“आम्ही खडकीचे भाई आहोत!” हप्ता न दिल्याने रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; 2 गुंडांना बेड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 16:12

पुणे : हप्त्याची मागणी नाकारल्याच्या रागातून रिक्षाचालकासह तिघांवर चाकूने सपासप वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खडकी परिसरात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये निहाल गवळी (वय 20, रा. श्रृती मोहल्ला, खडकी) आणि पृथ्वी पवार ऊर्फ नानू (वय 20, रा. खडकी) यांचा समावेश आहे. तर गणेश रास्ते ऊर्फ पिंट्या याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी गंगाराम तोटाप्पा गायकवाड (वय 40, रा. सावित्री विहार, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात गंगाराम गायकवाड, चंद्रकांत बडनेर आणि परशुराम चौडाप्पा गायकवाड हे जखमी झाले असून परशुराम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, 7 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रेंजहिल्स येथील छोट्या बोगद्याजवळ गंगाराम गायकवाड, चंद्रकांत बडनेर आणि परशुराम गायकवाड हे उभे राहून गप्पा मारत होते. त्यावेळी निहाल गवळी, पृथ्वी पवार आणि गणेश रास्ते हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी गायकवाड यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी धमकावण्यास सुरुवात केली.

यानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी चाकू काढून गंगाराम गायकवाड यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या चंद्रकांत बडनेर यांच्यावरही हल्ला करण्यात आला. तसेच परशुराम गायकवाड यांच्या पोटावर आणि डोक्यावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत पुन्हा हप्ता न दिल्यास कुटुंबीयांनाही सोडणार नसल्याची धमकी दिली आणि तेथून पसार झाले. जखमी तिघांना तातडीने रुग्णवाहिकेतून वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, खडकी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून निहाल गवळी आणि पृथ्वी पवार यांना अटक केली आहे. निहाल गवळी याच्यावर यापूर्वीही खुनासह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पैशांची मागणी, सतत टोमणे, गर्भपातासाठी दबाव! हवेली तालुक्यात सासरच्यांकडून विवाहितेचा शारीरिक अन् मानसिक छळ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 17:04

थेऊर फाट्यावर भरधाव एसटीची दुचाकीला धडक; तरुणाचा पाय चिरडला, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 16:56

पुण्यातील ‘नाईट लाईफ’ला ब्रेक! खाऊ गल्ल्या, हातगाड्या आणि टपऱ्या रात्री 10 वाजताच होणार बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Wednesday, 10 June 2026, 16:53

पैशांचं आमिष दाखवलं अन् आर्मी अधिकाऱ्यालाच फसवलं! पुण्यातल्या सीए दाम्पत्याचा कारनामा…

Wednesday, 10 June 2026, 16:31

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Wednesday, 10 June 2026, 16:21

“काँग्रेसला निवडणूक लढूच न देण्याचा कट झाला”; माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

Wednesday, 10 June 2026, 16:17
Next Post

मंदिर-मशिदींनंतर आता बुद्ध विहार अन् चर्च रडारवर; पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर चालवणार बुलडोजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.