Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैशांचं आमिष दाखवलं अन् आर्मी अधिकाऱ्यालाच फसवलं! पुण्यातल्या सीए दाम्पत्याचा कारनामा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 16:31

पुणे : ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मिती व्यवसायात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत निवृत्त सुभेदार आणि त्यांच्या नातेवाईकांची तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोल्हापूरमधील कंपनी संचालकांसह पुण्यातील एका सीए दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभेदार किशोर देवसिंग बरंडवाल (वय 54, रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये जलील नूरुद्दीन किरणगी, सचिन सिताराम झेपले, वैभव खामकर, शिल्पा सुशांत फडणवीस आणि सुशांत शरदचंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये बरंडवाल यांची ओळख मित्राच्या माध्यमातून कोल्हापूर येथील एका कंपनीच्या संचालकांशी झाली होती. कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा 15 टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन आरोपींनी दिले होते. तसेच ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मिती क्षेत्रात कंपनी मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे सांगून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

या आश्वासनांवर विश्वास ठेवून बरंडवाल आणि त्यांचे नातेवाईक पवनकुमार पवार यांनी सुरुवातीला 29 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर फेब्रुवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये एकूण 1 कोटी 70 लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

यानंतर गुंतवणूकदारांना नव्या कंपनीचे शेअर्स देण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रक्रियेत पुण्यातील सीए दाम्पत्यानेही विश्वास संपादन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र काही काळानंतर गुंतवणुकीवरील परतावा मिळणे बंद झाले. पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी 2 कोटी 37 लाखांहून अधिक रक्कम परतावा आणि बोनस म्हणून देण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच 18 लाख आणि 20 लाख रुपयांचे असे एकूण 38 लाख रुपयांचे धनादेश दिले. मात्र हे दोन्ही धनादेश बँकेत सादर केल्यानंतर बाऊन्स झाल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बरंडवाल यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केवळ पोट भरणे म्हणजे पोषण नाही! शरीराला नेमके काय हवे? जाणून घ्या निरोगी राहण्याचे सोपे उपाय

Wednesday, 10 June 2026, 18:02

पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटीचा कट उधळला; मांजरीत गावठी पिस्टल, काडतुसे आणि सहा घातक हत्यारांसह तिघे जेरबंद

Wednesday, 10 June 2026, 17:57

कॉकरोचनंतर एल्विश यादवची ‘खरगोश जनता पार्टी’ चर्चेत

Wednesday, 10 June 2026, 17:47

“मोदींची नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” शरद पवारांनी इंदिरा गांधींचा तो किस्सा सांगत मोदींना लगावला टोला

Wednesday, 10 June 2026, 17:42

मावळमधील पाच शाळा पाच वर्षांपासून वाढीव अनुदानापासून वंचित, चूक शासकीय अधिकाऱ्यांची आणि शिक्षा आम्हाला का? पिडीत शिक्षकांचा आक्रोश

Wednesday, 10 June 2026, 17:38

पैशांची मागणी, सतत टोमणे, गर्भपातासाठी दबाव! हवेली तालुक्यात सासरच्यांकडून विवाहितेचा शारीरिक अन् मानसिक छळ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 17:04
Next Post

पुण्यातील 'नाईट लाईफ'ला ब्रेक! खाऊ गल्ल्या, हातगाड्या आणि टपऱ्या रात्री 10 वाजताच होणार बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.