शिरगाव, ता. 10 : शहरी भागासाठी असलेला पटसंख्येचा नियम ग्रामीण व डोंगरी भागातील शाळाना लावून मावळ तालुक्यातील ५ शाळा पाच वाढीव अनुदानासाठी अपात्र करण्यात आल्या आहेत. या पाचही शाळांमधील सुमारे ३३ ते ३५ शिक्षक गेले पाच वर्ष अनुदानाच्या प्रतीक्षेत शासनाचे उंबरठे झिजवत आहेत परंतु शासनाला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीला या शिक्षकांना द्यायला वेळ नाही.

याविषयी अधिक माहिती अशी की, आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय शिरगाव, उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय सांगीसे, वारू कोथुर्णे माध्यमिक विद्यालय वारू कोथुर्णे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय घोणशेत, स्व.वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय देवघर आदी शाळांना ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अंशतः अनुदानित असणाऱ्या या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेतला. यात मावळ तालुक्यतील काही शाळा होत्या. शहरी भागासाठी असणारा पटसंख्येचा नियम ग्रामीण आणि डोंगरी बागात असणार्या या शाळांना लावल्याने या शाळा वाढीव अनुदानासाठी अपात्र करण्यात आल्या.
यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी शिंदे सरकार स्थापन परंतु तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या शाळांबाबत काहीही केले नाही. त्यामुळे सदर शाळांमधील शिक्षक गेल्या दोन वर्षापासून वाढीव अनुदानापासून वंचित आहेत .व मंत्री,आमदार,या मतदार संघाचे शिक्षक आमदार,खासदार यांचे दारे झिजवत आहेत. या विषयी सबंधित शाळांनी शिक्षण आयुक्त यांचेकडे तक्रार करून दाद मागितली असता त्यांनी शिक्षणाधिकारी पुणे,उपसंचालक,संचालक यांना निर्देश देवून अहवाल मागवला होता. या सर्व अधिकाऱ्यांनी या शाळा पात्र आहेत असा स्वयंस्पष्ट अहवाल दिला आहे. आणि या अहवालावरून आयुक्त यांनी या शाळा पात्र असल्याचे शासनाला तीन वर्षापूर्वीच कळवले आहे तरी आजपर्यंत या शाळांबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
हे शिक्षक या संदर्भात मंत्रालयात गेले असता त्यांना तेथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात आणि धमकावतात आणि वेळ मारून नेली जाते. मावळात दिवंगत अजित दादांचे अत्यंत लाडके आणि विश्वासु आमदार सुनील शेळके. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे माजी राज्यमंत्री या मतदार संघाचे आहेत. शिंदे सरकार मध्ये ज्यांचा शब्द मोलाचा आहे असे मानले जाते असे खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे गणले जाणारे खासदार या मतदार संघात असताना या शिक्षकांना ५ वर्ष अनुदानाची वात पहावी लागते हे अनाकलनीय आहे.
कोट :
सबंधित शाळांमधील सर्वच शिक्षक गेले पाच वर्ष माझ्या संपर्कात आहेत.यांची लक्षवेधी मी अधिवेशनात मांडली आहे परंतु शासन याबाबत उदासीन आहे. या सर्दर्भात मी मुख्यमंत्री यांची वेळ घेवून लवकरच यावर तोडगा काढण्याची विनंती करणार आहे. जयंत असगावकर आमदार शिक्षक मतदार संघ पुणे.
कोट : या शाळांच्या अनुदानाचा प्रश्न जुना आहे मला संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय यावर बोलणे उचित ठरणार नाही ,मी माहिती घेऊन बोलतो.
डॉ. भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी पुणेकोट :
शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा हे शिक्षक पाच वर्ष भोगत आहेत.आणि यावरती कहर म्हणजे यांचा प्रश्नांच कुणी ऐकून घेत नाही.शासकीय अधिकारी वर्गाची संवेदनशीलता हरवली आहे.
खंडेराव जगदाळे राज्य उपाध्यक्ष विनाअनुदानित कृती समिती.







