Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटीचा कट उधळला; मांजरीत गावठी पिस्टल, काडतुसे आणि सहा घातक हत्यारांसह तिघे जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 June 2026, 17:57

लोणी काळभोर, ता. १० : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ पथकाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा मोठा कट उधळून लावला. मांजरी येथील भापकर मळा रेल्वे पुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी तिघांना आज बुधवारी (ता. १०) पहाटेच्या सुमारास अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, तलवार, तीन कोयते, रावण हत्यार, धारदार स्टील पाईप, मिरची पावडर, दोरी आणि कारसह तब्बल ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील आणखी तीन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २६, रा. भापकर वस्ती, मांजरी), रामजितसिंग रंजितसिंग टाक (वय २७, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि अभयसिंग सिकंदरसिंग जुनी (वय २१, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीनाची नावे आहेत. रोशन घाडगे (रा. मांजरी खुर्द), शंकरसिंग टाक आणि समीर ऊर्फ कमांडो (दोघे रा. हडपसर) हे तिघेजन फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील अवैध धंदे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांचे पथक बुधवारी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी हा साथीदारांसह होंडा सीआर-व्ही कारमध्ये भापकर मळा रेल्वे पुलाजवळ थांबला असून ते सर्वजण फुरसुंगी फाटा परिसरातील पेट्रोलपंप आणि महामार्गावरील वाहनांना लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत.

या घटनेचीमाहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून रेल्वे पुलाजवळ वाहन आडवे लावत कार अडवली. यावेळी कारमधील काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले; मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. अजयसिंग दुधानी याच्या झडतीत चार जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर कारची तपासणी केली असता डॅशबोर्डमधून एक गावठी पिस्टल सापडले.

 

वाहनाच्या आतील भागातून तीन धारदार कोयते, एक तलवार, रावण हत्यार, दातेदार स्टील पाईप, मिरची पावडरची पाकिटे आणि दोरी असा दरोड्यासाठी वापरण्यात येणारा साहित्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच दोन मोबाईल फोन आणि होंडा सीआर-व्ही कारही पोलिसांनी जप्त केली. सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख ११ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी फुरसुंगी फाटा, सोलापूर रोड परिसरातील वाहनचालकांना लुटण्याचा तसेच रात्री सुरू असलेल्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या गुन्ह्यातील रोशन घाडगे, शंकरसिंग टाक आणि समीर ऊर्फ कमांडो हे तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पुणे शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी बेकायदेशीररित्या पिस्टल, काडतुसे व घातक हत्यारे जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींच्या विरोधात मांजरी पोलिस ठाण्यात शस्‍त्र अधिनियम, १९५९ – 25,3,4 ; महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ – 135,37(1),37(2),37(3) ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 310(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43
Next Post

केवळ पोट भरणे म्हणजे पोषण नाही! शरीराला नेमके काय हवे? जाणून घ्या निरोगी राहण्याचे सोपे उपाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp