Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जळगावहून पुण्यात येऊन करायचे हातचलाखी! रिक्षात महिलांच्या शेजारी बसायचे अन् मग सुरु व्हायचा लुटारूंचा खेळ; पोलिसांनी सापळा रचला अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 14:37

पुणे: पुण्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जळगावहून पुण्यात येऊन चोरी करणाऱ्या या टोळीतील तीन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील गणेश उर्फ मेमरी हा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अटक केलेल्या आरोपींची नावे शाकीर जाकीर तेली (वय 29, रा. कात्रज), मोहसीन खान नूर खान (वय 31, रा. जळगाव) आणि इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय 50, रा. जळगाव) अशी आहेत. हे आरोपी रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसायचे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून संधी साधत दागिने लंपास करायचे.

14 जून रोजी एका ज्येष्ठ महिलेने पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठदरम्यान रिक्षाने प्रवास केला होता. यावेळी आरोपींनी संगनमत करून महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना ही टोळी जळगावहून पुण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शाकीर तेली याला कात्रजमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी मोहसीन खान आणि इस्माईल शेख हे चोरीच्या उद्देशाने मालधक्का चौकात आले असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

 

चौकशीत आरोपींनी सिंहगड रस्ता, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

'पिस्तुल काढ, याचा जीव घे...' पुतणीने 'लव्ह मॅरेज' केल्याचा राग अन् जावयावर कोयत्याने हल्ला; पहा हल्ल्याचा धक्कादायक Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp