Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रॅफिकचा ‘हाय अलर्ट’! उद्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 July 2026, 19:19

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होत असल्याने पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतुकीवर निर्बंध असणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी, एफ.सी. रोड, लक्ष्मी रोड, बुधवार चौक आणि नाना पेठ मार्गे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी पोहोचणार आहे. या मार्गावर पहाटे ३ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी, नाशिक फाटा, दापोडी, हॅरिस पूल, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, एफ.सी. रोड, लकडी पूल, सेवासदन चौक, लक्ष्मी रोड आणि नाना पेठ मार्गे निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी पोहोचणार आहे. या मार्गावरही वेळेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बोपोडी, खडकी, औंध, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप, कर्वे रस्ता, जहांगीर रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता आणि इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत एफ.सी. रोड, फर्ग्युसन रोड, गणेशखिंड रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसर, बेलबाग चौक, सेवासदन चौक, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात टप्प्याटप्प्याने वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील. तसेच काही रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

पालखी मुक्कामाच्या काळात पालखी विठोबा मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर तसेच परिसरात कोणत्याही खासगी वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांच्या वाहनांसाठी शहरातील विविध भागांत स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय ९ ते ११ जुलैदरम्यान पेट्रोल आणि डिझेल टँकरच्या वाहतुकीवरही काही भागांत निर्बंध असणार आहेत. वाहतूक सुरळीत राहावी आणि गैरसोय टाळावी यासाठी नागरिकांनी प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घेऊन पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे ग्रामपंचायत प्रशासकांना आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.