Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सात-बारा दुरुस्तीचा तिढा! कारवाईच्या भीतीने तहसीलदारांचा ‘ब्रेक’; हजारो शेतकऱ्यांची कामे प्रलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 June 2026, 17:21

पुणे: पुणे जिल्ह्यातील सात-बारा उताऱ्यांमधील त्रुटी आणि दुरुस्ती प्रकरणांमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सात-बारा नोंदींमधील चुका आणि गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने अनेक तहसीलदार आता दुरुस्तीच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आलेल्या सात-बारा संगणकीकरण प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आले होते. महसूल कायद्यातील कलम 155 अंतर्गत अशा चुका दुरुस्त करण्याची तरतूद आहे. या कलमानुसार नाव, क्षेत्रफळ, वारस नोंदी, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यासंदर्भातील नोंदी यांसारख्या बाबींमध्ये आवश्यक दुरुस्ती करता येते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुनर्विलोकनातून संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सरकारने 2020 ते 2025 या कालावधीतील सुमारे 38 हजार सात-बारा प्रकरणांची तसेच त्यापेक्षा जुन्या नोंदींची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तपासणी केली असता 38 हजारांहून अधिक सात-बारा नोंदींची छाननी करण्यात आली. त्यापैकी 424 प्रकरणांमध्ये दोष आढळल्याचे समोर आले.

समितीच्या अहवालानुसार काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप निश्चित करण्यात आले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी अशा एकूण 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या कारवाईला सुमारे दोन महिने उलटले आहेत.

 

दरम्यान, संगणकीकरणातील अनेक चुका प्रत्यक्षात दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे मत महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, कोणतीही दुरुस्ती केल्यानंतर त्यावर आक्षेप घेऊन कारवाई होण्याची भीती निर्माण झाल्याने अनेक तहसीलदार कलम 155 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांवर निर्णय घेण्यास पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे जिल्ह्यातील सात-बारा दुरुस्तीची हजारो प्रकरणे प्रलंबित राहिली असून, शेतकरी आणि नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54
Next Post

खाद्यसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; 7 जणांना विषबाधा झाल्याने एफडीएचा मिठाई विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp