Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 September 2026, 17:54

हडपसर : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हडपसर येथील 63 वर्षीय महिलेची तब्बल 7 लाख 3 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘ईझी इन्व्हेस्ट ट्रेडिंग कंपनी’मधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तींनी महिलेला वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर पैसे पाठवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार महिला येवला येथील मातोश्री आयुर्वेद कॉलेजमध्ये मेडिकल शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 3 जून 2026रोजी त्या युट्यूब पाहत असताना सुधा मूर्ती यांच्या नावाने गुंतवणुकीबाबतचा व्हिडीओ दिसला. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. जाहिरातीतील बटनावर क्लिक केल्यानंतर काही वेळातच त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला.

समोरील महिलेने आपले नाव मेहेजबीन असून, आपण ‘ईझी इन्व्हेस्ट ट्रेडिंग कंपनी’मधून बोलत असल्याचे सांगितले. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये भरून नोंदणी करावी लागेल, तसेच कंपनीकडून मार्गदर्शन करून नफा मिळवून दिला जाईल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांकडून वैयक्तिक कागदपत्रांची माहिती घेऊन एका यूपीआय आयडीवर 19 हजार 800 रुपये पाठवण्यास सांगण्यात आले.

यानंतर संबंधितांनी तक्रारदारांचे ‘ईझी इन्व्हेस्ट’ अॅपवर खाते तयार केले. अॅपमध्ये गुंतवणुकीवर नफा झाल्याचे दिसत होते. सुरुवातीला दोन दिवसांत सुमारे सहा हजार रुपये नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी नफ्याची रक्कम काढण्यासाठी विड्रॉ रिक्वेस्ट केली असता, त्यांच्या कॅनरा बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झाले. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसला.

यानंतर मेहेजबीन, विकास आणि विनोद नावाच्या व्यक्तींनी वेगवेगळे यूपीआय आयडी पाठवून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. चांगला परतावा मिळेल, तसेच ट्रेडिंगमधून नफा करून देऊ, असे सांगत तक्रारदारांकडून 3 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे एकूण 7 लाख 3 हजार 900 रुपये स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, अॅपवर नफा आणि नुकसान अशा दोन्ही रकमा दिसत होत्या. तक्रारदारांनी ट्रेडिंग करायचे नसल्याचे सांगितल्यानंतरही संबंधित व्यक्ती नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत राहिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा युट्यूबवर सुधा मूर्ती यांचा व्हिडीओ पाहिला. त्यावेळी त्यांच्या नावाने बनावट व्हिडीओ तयार करून जाहिरात करण्यात आल्याचे समोर आल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी पैसे पाठवणे बंद केले.

तक्रारदारांनी ऑनलाइन सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली असून, त्यानंतर सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर येथेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित मोबाईल क्रमांक, यूपीआय व्यवहार आणि आरोपींच्या भूमिकेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बनावट व्हिडीओच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याने, अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून ऑनलाइन गुंतवणूक करण्यापूर्वी खातरजमा करण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29

वाल्मिक कराड असलेल्या बीड जेलमध्ये ‘ऑल इज वेल’! तिन्ही उच्चस्तरीय पथकांचा मोठा निष्कर्ष,नेमकं काय समोर आलं?

Tuesday, 27 October 2026, 18:53

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

Tuesday, 27 October 2026, 18:50

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

Tuesday, 27 October 2026, 18:48

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात! गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनाची मागणी

Tuesday, 27 October 2026, 18:43
Next Post

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp