Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ! तरुणीने भरसभेत ओतून घेतलं अंगावर पेट्रोल; जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 18:42

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक खळबळजनक घटना घडली. बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना विविध विषयांवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी संबंधित तरुणी अचानक सभागृहात दाखल झाली. तिच्याकडे असलेले पेट्रोल तिने अंगावर ओतताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत तिचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर संबंधित तरुणीने माध्यमांशी बोलताना मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले. गेल्या अनेक वर्षांपासून लग्नाचे आश्वासन देत आपली फसवणूक करण्यात आल्याचा दावा तिने केला. अनेकदा न्याय मिळविण्याचा प्रयत्न करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नैराश्यातून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले.

 

घटनेनंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर असून पुढील चौकशी सुरू आहे.

या प्रकारानंतर जिल्हा परिषद परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. प्रशासकीय इमारतीबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. संबंधित आरोपांबाबत पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.