ओमकार भोरडे

रांजणगाव गणपती: जून – लग्नासाठी हट्ट धरून सावत्र वडिलाने 3 वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण करून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली आहे.

17 जून रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 6:00 वा. दरम्यान कारेगाव, ता. शिरूर येथील कल्याणी कंपनीमागे, हेमंत कोहकडे यांच्या खोली क्र. 37 मध्ये हा प्रकार घडला आहे.
राणी पप्पू कोल, वय 25, व्यवसाय नोकरी, सध्या रा. कारेगाव कल्याणी कंपनीमागे, हेमंत सिताराम कोहकडे यांच्या खोली क्र. 37, ता. शिरूर, मूळ रा. ग्राम पोळी बरबसपुर, ता.जि. अनुपपुर, मध्यप्रदेश, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घडलेला प्रकार उघडकीस आला.
आरोपी देवांशु अदित्य साहु, रा. बरटोला, जिल्पा ता.जि. अनुपपुर, मध्यप्रदेश हा फिर्यादीशी लग्न करण्याचा तगादा लावत होता. “तुझा मुलगा कु. अंशु याला तुझ्या नवऱ्याकडे सोडून येत नाहीस, माझ्याशी लग्न का करत नाहीस?” या कारणावरून तो चिडला. चिडून जाऊन आरोपीने फिर्यादीचा 3 वर्षांचा मुलगा कु. अंशु पप्पू कोल याला तोंडावर, ओठावर, डोळ्यावर, नाकावर कशानेतरी बेदम मारहाण केली. यात चिमुकला अंशु गंभीर जखमी होऊन मरण पावला.
घटनेच्या सुमारे 30 मिनिटांतच, म्हणजे दि. 18 जून रोजी रात्री 12:49 वा. आरोपी देवांशु अदित्य साहु याला पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग व पोलीस निरीक्षक कुमार कदम, रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी भेट दिली. गुन्हा दाखल अंमलदार पो.उपनि अविनाश थोरात असून तपास पो.उपनि. शिवाजी मुंढे करत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. तीन वर्षांच्या निरागस बालकाचा केवळ लग्नासाठीच्या आग्रह धरल्याने जीव गेला. ही घटनाझाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







