पुणे : शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांचे नियोजन नसल्यामुळे पुणेकर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी बाबत अनेकदा माध्यमे आणि सामाजिक संस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु शासन प्रशासनाला ही समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. आता वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणे जागतिक पातळीवर पोहचले आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार देशातील तीन शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पुण्याचा चौथ्या क्रमांक लागतो. तर महाराष्ट्रातून पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतात ‘या’ शहराचा पहिला क्रमांक
या संबंधित अधिक माहिती अशी की, प्रसिद्ध झालेल्या टॉमटॉमच्या ट्रॅफिक निर्देशांकाच्या अहवालानुसार, भारतातील तीन शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या होत असल्याचे म्हटले आहे. 2024 च्या निर्देशांकानुसार कोलकता हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे वाहतूक कोंडी असणारे शहर आहे असे म्हटले आहे. कोलकता शहरात १० किलोमीटर एवढे अंतर पारकरण्यासाठी ३३ मिनिटे एवढा कालावधी लागतो. जागतिक पातळीवर कोलकता वाहतूक कोंडी असणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोलंबियामधील बॅरेंक्विला शहर आहे.
भारतात बंगळुरू शहराचा दूसरा तर पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर
टॉमटॉम ट्रॅफिक निर्देशांकानुसार, भारतातील्या तीन शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे शहर जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर तर भारतात तिसऱ्या क्रमांकावरचे शहर ठरले आहे. भारतची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरू हे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे वाहतूक कोंडी असणारे शहर आहे असे अहवालातून समोर आले आहे.
बंगळुरुमध्ये 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटं लागतात. तर भारतातून तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील पुणे शहर आहे. पुण्यातही 10 किलोमीटर प्रवासासाठी सरासरी 33 मिनिटे येवढा वेळ लागतो. पुणे शहराचा वाहतूक कोंडीत जगात चौथा क्रमांक आहे.
देशात हैदराबाद आणि चेन्नई चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर
भारतीय शहरांमध्ये हैदराबाद आणि चेन्नई देशात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबईकरांसाठी दिलासा म्हणजे देशातील पहिल्या पाच वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात मुंबईचा समावेश नाही. या अहवालानुसार मुंबईचा सहावा तर अहमदाबादचा सातवा क्रमांक आहे. नवी दिल्ली दहाव्या स्थानावर आहे. जागतिक पातळीवर मुंबई आणि अहमदाबाद एकोणचाळीसाव्या आणि त्रेचाळीसाव्या क्रमांकावर आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2024 साठी सहाशे दशलक्षाहून अधिक कनेक्ट केलेल्या उपकरणांमधून माहिती गोळा केली आहे. ज्यामध्ये बासष्ट देशांमधील पाचशे शहरांचा समावेश असलेल्या टॉमटॉम या ऍप्लिकेशनचा वापर करून इन-कार नेव्हिगेशन सिस्टम आणि स्मार्टफोनचा या तंत्राचा उपयोग करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.