Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: ठरलं तर मग! पुण्यात ऐतिहासिक युती होणार; ‘घड्याळ’ की ‘तुतारी’? चिन्हावरून पेच वाढला, पुणे-पिंपरीत राजकीय भूकंप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 11:32
Pune Politics: If it is decided then! There will be a historic alliance in Pune; 'Ghadyal' or 'Tutari'? Embarrassment over the symbol increased, political earthquake in Pune-Pimpri

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात (Ajit Pawar) मोठ्या घडामोडी घडत असून, दोन्ही राष्ट्रवादी (Sharad Pawar) काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एके काळचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात Pune News) आघाडी होण्याची शक्यता असून, ही आघाडी जाहीर करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 26 डिसेंबर रोजी याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. (Pune Mahapalika Election)

एकत्र लढण्याच्या चर्चा

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सोमवारी 22 डिसेंबर रात्री आणि मंगळवारी 23 डिसेंबर सकाळी प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या. बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक पातळीवरील अनेक नेत्यांनीही या आघाडीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

प्रशांत जगताप

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आघाडीला विरोध दर्शवला असून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सादर केला आहे. याआधी अजित पवार यांनी स्थानिक परिस्थितीनुसार आघाडीचा निर्णय घ्यावा, असे संकेत दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

जागावाटपाचं सूत्र लवकरच ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. जागावाटपाचे सूत्र लवकरच ठरवले जाईल आणि काही जागांबाबत तडजोडही केली जाऊ शकते. आघाडीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांत जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी समीकरणं ठरणार

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे याआधीच ठरले आहे. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संभाव्य युती यामुळे आगामी राजकीय समीकरणे कशी असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घड्याळ की तुतारी?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना निवडणूक चिन्हावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व उमेदवारांनी ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी याला विरोध केला आहे. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढल्यास अजित पवार गटात प्रवेश केल्यासारखे भासेल, अशी त्यांची भूमिका आहे. त्याऐवजी ‘तुतारी वाजविणारी व्यक्ती’ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह आहे. मात्र सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचे समजते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Next Post
pune-politics-both-brothers-together-in-pune-but-who-is-the-big-brother-mns-should-stay-behind-shiv-sena-should-be-on-top-embarrassment-over-seat-sharing-increases

Pune Politics: पुण्यात दोन्ही भाऊ एकत्र पण 'मोठा भाऊ' कोण? "मनसेनं मागं राहावं, शिवसेनाच वरचढ!" जागावाटपावरून पेच वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.