Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत झडप घातली अन् तरुणांजवळ सापडलं इंजेक्शन; सत्य समजताच पोलिसही चक्रावले…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 14:55

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात नशायुक्त इंजेक्शनच्या अवैध साठ्यावर वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत ‘मॅफेन्टरमाईन सल्फेट’ या इंजेक्शनच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्या ऑनलाईन मागवण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. या घटनेमुळे नशायुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्रीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ सातमध्ये सध्या ड्रग्ज आणि नशायुक्त पदार्थांविरोधात ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री गस्तीवर असलेल्या वाघोली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही तरुण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा घेऊन येणार आहेत. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी आय. व्ही. इस्टेट रोडवरील ऑर्चिड साई प्रॉपर्टीज परिसरात सापळा रचला.

पहाटेच्या सुमारास दोन संशयित तरुण तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांची ओळख सूरज पद्माकर भुत्ते (वय १८, मूळ रा. नांदेड, सध्या वाघोली) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९, रा. लोणीकंद) अशी पटली.

 

दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ३० मिली क्षमतेच्या ‘मॅफेन्टरमाईन सल्फेट’ इंजेक्शनच्या १०० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शने ऑनलाईन मागवल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या अवैध व्यवहारामागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. ही इंजेक्शने नेमकी कोणाला विकली जाणार होती, त्यांचा पुरवठादार कोण आहे आणि या साखळीत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध तपास पथक घेत आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक अप्पासाहेब शेळके यांच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात औषधे आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशायुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत आणलं! शिरूरमध्ये डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव, CCTV व्हिडिओ व्हायरल

Saturday, 25 July 2026, 11:41

“अहो साहेब, आमचे हे ‘गे’ आहेत, यांचे पुरुषांसोबत संबंध आहेत”; 20 वर्षे संसार केल्यानंतर पत्नीची पुण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 25 July 2026, 11:34

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59
Next Post

पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, रांजणगाव गणपती परिसरात चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ; चार शेळ्या व कोंबड्या लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.