Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे प्राईम न्यूजचा प्रभाव; तक्रारवाडी स्मशानभूमीत पुन्हा उजेड, मात्र रस्त्याचा अंधार कायम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 11:39

सागर जगदाळे

Pune News: भिगवण : तक्रारवाडी स्मशानभूमीतील अंधार आणि सोलर हायमास्ट दिवे बंद पडल्याबाबत पुणे प्राईम न्यूजने नुकतीच सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत तक्रारवाडीचे सरपंच शरद वाघ यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून सोलर हायमास्ट दिवे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.

सदर सोलर हायमास्ट दिव्यांच्या बॅटऱ्या खराब झाल्यामुळे दिवे अनेक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नावर पुणे प्राईम न्यूजने प्रभावीपणे आवाज उठवल्यानंतर ठेकेदाराने तातडीने बॅटऱ्या बदलून नवीन यंत्रणा बसवली. परिणामी स्मशानभूमी परिसरात पुन्हा एकदा उजेड पडला असून अंधार दूर झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही अंत्यविधीप्रसंगी टॉर्चच्या उजेडात जावे लागल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचे गांभीर्य अधिक ठळक झाले होते.

 

स्मशानभूमी परिसरातील अंधार दूर झाला असला तरी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मात्र अद्याप समस्याग्रस्त आहे. गावापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून रात्री दिवाबत्ती नसल्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाताना मोठी अडचण निर्माण होते. एखाद्या दिवशी अपघातासारखी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

म्हणूनच स्मशानभूमीतील दिव्यांप्रमाणेच रस्त्याच्या दुतर्फा दिवाबत्तीची सोय करावी तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पुणे प्राईम न्यूजने उचललेला मुद्दा प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर कार्यवाही झाली, हा या बातमीचा सकारात्मक परिणाम मानला जात असला तरी तक्रारवाडीतील विकासाचा प्रवास अजून अपूर्ण असल्याचे वास्तव समोर येत आहे.

◼ चौकट
ग्रामपंचायत तक्रारवाडीचा कारभार स्वीकारून आठ दिवस होताच प्राथमिक गरज ओळखून स्मशानभूमीतील अंधार दूर करण्यासाठी ठेकेदाराशी संपर्क साधून सोलर हायमास्ट दिवे त्वरित सुरू करण्यात आले. आता प्रश्न आहे तो रस्त्याचा. तोही लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. रस्ता वन खात्याच्या हद्दीतून जात असल्यामुळे काही पाठपुरावा आवश्यक आहे. त्यासाठी वन खात्याशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
— शरद वाघ, सरपंच, तक्रारवाडी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

Wagholi Suicide News: गॅलरीत गेली अन् थेट टोकाचं पाऊल उचललं; वाघोलीत 18 वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी शेवट, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp