पुणे: दिवाळीत पुणे (Pune News) पोलिसांनी ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अधीन घेतला गेला आहे. नियम मोडल्यास पोलिस तातडीने कारवाई करतील.

पुणेकरांनी दिवाळी शांत आणि सुरक्षित साजरी करण्यासाठी पोलिसांनी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत:
-
ध्वनी मर्यादा: फटाक्यांचा आवाज 124 डेसिबलपेक्षा जास्त नसावा.
-
साखळी फटाके: 100 पेक्षा जास्त साखळी फटाके विकणे, उत्पादन किंवा वापर पूर्णपणे बंदी राहणार आहे.
-
शांतता क्षेत्र: शाळा, रुग्णालय आणि न्यायालयाच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई आहे.
-
सार्वजनिक ठिकाणे: रस्ते, पूल, घाट किंवा प्रमुख मार्गांवर फटाके फोडणे आणि मार्गाजवळील 10 मीटरच्या परिसरात फटाके फोडणे निषिद्ध आहे.
फटाके विकणाऱ्यांसाठी तात्पुरते परवाने दिले जाणार आहेत. यावर्षी हे परवाने 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध असतील. पुणे पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दिवाळीच्या सणात सुरक्षितता आणि शांतता राखता येईल.







