Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 19:25

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर वारजे आणि वाकड परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वारजे येथे मुठा नदीवर आणि वाकड येथे मुळा नदीवर बांधलेले नवे पूल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. या दोन्ही पुलांमुळे वाहतुकीला वेग मिळण्यास सुरुवात झाली असून, मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ सुमारे ३० ते ४० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पूल ते रावेत या दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. महामार्गालगत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा विस्तार आणि वाढते नागरीकरण यामुळे महामार्गावरील लांब पल्ल्याच्या वाहतुकीसोबत स्थानिक वाहतुकीतही मोठी वाढ झाली. त्यामुळे विशेषतः वारजे आणि वाकड परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.

या कोंडीचा परिणाम कात्रज नवीन बोगदा आणि नवले पूल परिसरावरही होत होता. या ठिकाणी वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहनचालकांचा मोठा वेळ कोंडीत जात होता.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी NHAIकडून वारजे येथे मुठा नदीवर आणि वाकड येथे मुळा नदीवर दोन नवे पूल बांधण्यात आले. हे दोन्ही पूल तीनपदरी असून आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. या पुलांमुळे वारजे, बाणेर, बालेवाडी, वाकड आणि भूमकर चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

 

वारजे येथील मुठा नदीवरील पूल ५०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे. या पुलासाठी ५२.६८ कोटी रुपये खर्च झाला आहे. वाकड येथील मुळा नदीवरील पूल १७५ मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असून, त्यासाठी ३१ कोटी रुपये खर्च झाला आहे. भूसंपादनासाठी अतिरिक्त २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या दोन्ही पुलांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ सुमारे १५ ते २० मिनिटांनी कमी होणार असल्याची माहिती NHAIचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp