Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रकार! ‘बायको सासरी नांदत नाही, माझं दुसरं लग्न लावून द्या’ तरुणाचं भाऊ अन् वडिलांसोबत रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 14:59

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बगाडवाडी येथे कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या वडिलांचा आणि सख्ख्या भावाचा खून केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृतांमध्ये जयराम महादू मुकणे (वय 65) आणि राजू जयराम मुकणे (वय 30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी युवराज मुकणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबाजी जयराम मुकणे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झाले होते. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत होती. त्यानंतर पुन्हा लग्न लावून द्यावे, अशी मागणी तो सातत्याने वडील आणि भावाकडे करत होता. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत होते. अखेर संतापाच्या भरात आरोपीने वडील आणि भावावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.

दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात अवघ्या 12 तासांच्या अंतरात दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

पहिल्या घटनेत अमोल अहिरे (वय 17) या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मंदाबाई अंगारखे (वय 45) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.

या सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ‘पैशांचा पाऊस’ आणि दरमहा १० टक्के परताव्याचे स्वप्न दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९५ लाखांचा चुना

Thursday, 17 September 2026, 16:49

निंबोडी सरपंच संतोष सोनवणे यांच्या तक्रारीनंतर जल जीवन मिशनच्या कामाची पाहणी; निकृष्ट कामाच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांची दखल

Thursday, 17 September 2026, 16:08

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाच्या रांगेतच महिलेसोबत घडलं भयंकर! गर्दीचा फायदा घेत टोळक्याचा कारनामा

Thursday, 17 September 2026, 15:56

गार्गीसाठी ‘आई जगदंब’चा माणुसकीचा घास; प्रत्येक थाळीतून 10 रुपये मदतीचा हात

Thursday, 17 September 2026, 15:35

पुण्यात नवरा-बायकोचा वाद, सासू मध्यस्ती करायला गेली अन् जावयाचं डोकं सटकलं; सरळ कोयता काढत….

Thursday, 17 September 2026, 15:08

पुण्यात तरुणींना जबरदस्ती करायला लावायचे ‘तसला’ प्रकार! ऑनलाईन फोटो पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढायचे अन् मग….

Thursday, 17 September 2026, 14:31
Next Post

विषारी दारूचा 'मास्टरमाईंड' गजाआड! सीआयडीची मोठी कारवाई; रसायन पुरवणाऱ्या पिता-पुत्रांना मुंबईतून ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp