पुणे: पुण्यातील चंदननगर भागातून चोरीची घटना समोर आली आहे. येथील एका रहिवाशी सोसायटीतील बंद घराचा दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातील ११ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तुषार राधेश्याम गुप्ता (वय ३१ वर्ष) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी तुषार हे चंदननगर येथील एका रहिवाशी सोसायटीत राहण्यास आहेत. शुक्रवारी (१३ जून) रोजी तुषार हे बाहेर गेले असल्यामुळे त्यांचे घर बंद होते. अज्ञात आरोपींनी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल.

त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उघडले. कपाटातील सोन्या-चांदीच्या मूर्ती, दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.







