पुणे : शहरातील कात्रज चौकामधील रसवंतीगृहाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरुन नेणाऱ्या सराईत चोरट्याचा भारती विद्यापीठ पोलिसांनी शोध घेत त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. मिथुन सुगंध लोखंडे (वय 22, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील रसवंतीगृहासमोर रस्त्यावर यामाहा कंपनीची दुचाकी 16 एप्रिल रोजी पार्क केली होती़. त्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही चोरी मिथुन लोखंडे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लोखंडे याच्याकडून चोरलेली यामाहा दुचाकी जप्त करण्यात आली.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.