Pune Crime: पुणे: पुण्यात चोरीचे प्रमाण काही कमी होईना अशातच एका मैत्रिणीच्या घरातून दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातले सोने चांदीचे दागिने आपण लॉकर किंवा एका सुरक्षित जागे ठेवतो. चोराच्या भीतीने पुण्यातील एका महिलेने सोन्याचे दागिने एका लॉकरमध्ये ठेवण्या ऐवजी पिंपात लपवून ठेवले पंरतु पिंपात ठेवलेले दागिने सुध्दा चोरट्यांच्या नजरात आले.

हेही वाचा- Daund News: कुरकुंभ येथे पिकअप व ट्रॅक्टरच्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू, पिकअप चालक फरार
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी परिसरातील इंदिरानगर येथील भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी चोरी झाली. महिलेने पिंपात ठेवलेले एक लाख ९७ हजार रुपये किमतीचे दागिने चक्क एका ओळखीच्याच महिलेने चोरले. या प्रकरणी महिलेने खडकी पोलिसांनी तिघांविरुधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला.
महिलेने फिर्याद दिली की, गुन्ह्यात सहभागी असलेली महिला नेहमी ये जा करत होती. महिला ओळखीची असल्याने घरात ती नेहमी यायची. घरातल्या प्रत्येक वस्तूकडे तिची नजर होतीच, त्यामुळे तिनं वेळ साधून पिंपात ठेवलेले दागिने चोरले. चोरी केल्यानंतर तीनं सर्व दागिने एका सराफाकडे गहाण ठेवले.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपींविरुधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. चोरीला गेलेल दागिने अद्याप हाती आले नाही त्यामुळे पोलीस कंबर कसून चौकशी करत आहे.






