पुणे: मागील तीन वर्षापासून रेकॉर्डवर असणारा गुन्हेगार टिपु पठाण, व त्यांचा भाऊ इजाज पठाण यांनी त्यांच्या 07 ते 08 साथीदारांसोबत बेकायदेशीर जमाव जमवून सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेकच्या प्लॉटवर ताबा घेणाचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या मालकीचे असलेले प्लॉट माझ्या भावाच्या नावे आहेत. ही जागा परत देण्यासाठी आरोपींनी 20 लाख रुपये मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सय्यदनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. टिपु पठाण व इजाज पठाण (वय 39 वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मालकीची सय्यदनगर, हडपसर, पुणे येथे सर्व्हे नंबर 75/6 मध्ये 1290 स्के फुट मोकळ्या प्लॉटची जागा आहे. आरोपी टिपु पठाण, व त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी 07 ते 08 साथीदारांना सोबत घेवून बेकायदेशीर जमाव करुन महिलेच्या प्लॉट वर वारंवार जावून ही जागा माझी असुन, सदर जागा मी माझा भाऊ इजाज पठाण याच्या नावाने खरेदी केली आहे. सदर जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून घ्या. नाहीतर जागा कशी खाली करुन ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहिती आहे. असे म्हणत त्याने तक्रारदार महिलेच्या प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून टाकले. त्यावर असलेले तक्रारदार महिलेचे नाव खोडून टाकले.
तसेच आरोपी टिपू पठाण याने जागा पाहीजे असलेस तर 20 लाख रुपयाची मागणी करुन आमच्या सोबत वाद घालून जबरदस्तीने तक्रारदार महिलेच्या प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. त्यानंतर तक्रारीनुसार काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. 100/2025, भारतीय न्याय संहिता कलम 308(2),329 (3), 351(2), 352, 189(1), 189(2), 191(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील रेकॉर्डवरील आरोपी रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण यांने कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यांतर त्याला तात्काळ ताब्यात घेवून त्यांच्यावर पोलीसांकडून प्रतिबंधक कारवाई करुन त्याची 14 दिवसांसाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा यात सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे काळेपडळ पोलीस ठाणे येथील तपास पथक नियुक्त करुन, तांत्रीक विष्लेशण व बातमीदारांमार्फत सय्यदनगर परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सय्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचुन शिताफिने आरोपी इजाज पठाण यास सय्यदनगर रेल्वे पटरीच्या जवळ ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्याला न्यायालयाने त्याची दिनांक 7 एप्रिल 2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमुद गुन्ह्यात इतर आरोपींचा 2 पथके नेमुण शोध घेवून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5 चे डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे (वानवडी विभाग पुणे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील( काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर), पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, यांनी केली आहे.