Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: लिफ्ट देतो म्हणून कारमध्ये बसवलं अन् 5 तास ओलीस ठेवलं! पुण्यात प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 February 2026, 22:12

पुणे: पुणे स्टेशनला जाण्यासाठी शास्त्रीनगर (Pune Crime) चौकात थांबलेल्या एका प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये घेत मारहाण करून लुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने तीन जणांना अटक केली असून, एक साथीदार अद्याप फरार आहे.

 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल किसन सावंत (वय 19, रा. समर्थनगर, खराडी), निशांत झुंबर बागुल (वय 21, रा. चिखलठाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि महेश रामकिशन सोनटक्के (वय 20, रा. खांदवेनगर, गीताई पार्क, लोहगाव) यांचा समावेश आहे. आरोपींकडून फिर्यादीचा चोरलेला मोबाईल, त्यांचे 3 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार आणि लोखंडी कोयता असा एकूण 7 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रेमजी पाटीदार (वय 42, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. ही घटना 30 जानेवारी रोजी रात्री 10 ते 31 जानेवारी पहाटे 2:30 या वेळेत घडली. शास्त्रीनगर चौकात थांबलेल्या पाटीदार यांना पांढऱ्या रंगाच्या डिझायर कारमधील चौघांनी लिफ्ट देतो असे सांगून गाडीत घेतले. त्यानंतर बंडगार्डन परिसरात फिरवत त्यांना मारहाण करण्यात आली. मोबाईलवरील गुगल पेच्या माध्यमातून जबरदस्तीने 18 हजार 800 रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि मोबाईल काढून घेऊन आरोपी पसार झाले.

घटनेनंतर गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे पथक चंदननगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शास्त्रीनगर चौकातील लुटीत वापरलेली कार आणि संशयित खराडीतील हॉटेल जत्रा येथे थांबले आहेत. खात्री करून पोलिसांनी छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपींनी चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने होणाऱ्या गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

Pune Crime: खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टचे गुन्हे असलेले सराईत गुन्हेगार अटकेत! देहूरोड, दिघी, सिंहगड अन् खडक परिसरातील वाहनचोरीचे गुन्हे उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.