Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: दुबई–टांझानियातील  ‘स्क्रॅप मटेरियल’ भारतात आणून कमी दरात पुरवठा करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेट पर्दाफाश 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 26 November 2025, 15:31
Dubai-Racket exposed for defrauding by luring Tanzanian scrap material to India at low prices

पुणे: दुबई व टांझानिया देशांतून कमी दरात ‘स्क्रॅप मटेरियल’ मिळवून भारतात पुरवठा करण्याचे आमिष दाखवून अनेक व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड खडक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह गुन्ह्यातील एक आरोपीस अटक केली आहे.  तर दुसरा आरोपी रुग्णालयातील उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आरोपींनी 2023 मध्ये सुमारे 57 टन स्क्रॅप मटेरियल दुबई येथून भारतीय बंदरांवर पाठवणार असल्याचे सांगून लाखो रुपयांच्या व्यवहारांचे आमिष दाखवले होते. यासाठी मुंबई, दिल्ली व गुजरात येथील कंपन्यांना संपर्क करून व्यवहार निश्चित करण्यात आला होता.

आरोपी सुनील बोराडे याने पीडित व्यावसायिकांकडून  3 कोटी 89 लाख 39 हजार 315 रुपये घेतले होते. व्यवहार निश्चित झाल्यानंतरही स्क्रॅप माल भारतात पोहोचवण्यात कोणतीही कार्यवाही न होता, संबंधितांनी पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे फसवणुक झाल्याचे समोर आले.

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच खडक पोलिसांनी सखोल तपास करून संबंधितांवर  महाराष्ट्र डिजिटल सुरक्षा अधिनियम, तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुख्य आरोपीची अटक; दुसरा आरोपी कस्टडीत मृत्यूमुखी

तपासादरम्यान मुख्य आरोपी भूपेंद्रसिंग उर्फ संजय कुमार राठोड याला अटक केली. त्याच्यावरील माहितीच्या आधारे दुसरा संशयित आरोपीही अटकेत घेतला होता. मात्र, पोलिस कस्टडीत असताना तब्येत बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाशी संबंधित 6 बँक खाते, दुबई व मुंबईतील आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तपासात आरोपी विदेशात पळून जाऊ नयेत म्हणून लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे.

सदर कारवाई  अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर, राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, कृषीकेश रावले, पोलीस उपयुक्त, परिमंडळ 1 पुणे शहर, अनुजा देशमाने, सहाय्यक पोलीस उपयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) , शर्मिला सुतार, मनोज कुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, भारत बोराडे, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष मोहिते, पो. हवालदार, योगेश कुंभार, राजाराम गाढवे, किरण खुडे, किरण घुटे, पोलीस शिपाई, संतोष साबळे यांनी केली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, असे ‘कमी दरात परदेशातून माल पाठविण्याचे’ आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद व्यवहारांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Sachin Gujar Kidnapping: The thrilling events of Sachin Gujar's kidnapping! Forced into a car, held at gunpoint three times; stripped naked and left on the street...

Sachin Gujar Kidnapping: सचिन गुजर यांच्या अपहरणाचा थरारक घटनाक्रम! जबरदस्ती कारमध्ये बसवलं, तीनदा पिस्तूल रोखलं; विवस्त्र केलं अन् भररस्त्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.