Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्याच्या आमिषाने रिक्षाचालकाची दीड लाखांची फसवणूक; बनावट पावत्या, बाऊन्स चेक व जीवे मारण्याच्या धमक्या

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 January 2026, 16:09

Pune Crime : पुणे, ता. 30 : महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स निम्मा करून देतो, उच्च अधिकाऱ्यांशी ओळख आहे, अशी थाप मारून एकाने हडपसर येथील रिक्षाचालकाची तब्बल 1 लाख 52 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच बनावट ऑनलाईन पावत्या, बाऊन्स झालेले चेक आणि पैसे मागितल्यावर पोलिस ओळखींची धमकी देत जीवे मारण्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणामुळे पुण्यातील दलालांचे साटेलोटे आणि सामान्य नागरिकांची लूट पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

सोहेल समीर जमादार (गंगा विलेज सोसायटी, हांडेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक युनूस इकबाल खान (वय 51, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस इकबाल खान यांचे एक गुंठा जागेत आर.सी.सी. बांधकाम केले असून, त्यावर महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स थकीत होता. ही थकबाकी भरताना मित्र इमरान खान यांच्या माध्यमातून सोहेल समीर जमादार या व्यक्तीशी ओळख झाली. तो महापालिकेतील “सर्व मोठ्या साहेबांचा जवळचा”, वकील असून कर संकलन विभागात त्याचे रोजचे उठबस असल्याचा दावा करत होता.

वैदुवाडी, रामटेकडी येथील अ‍ॅड. अस्लम शेख यांच्या कार्यालयात भेट जुलै2023 मध्ये झाली. यावेळी सोहेल जमादारने मोबाईलवर ऑनलाईन थकबाकी दाखवून ती 3 लाख 46 हजार रुपये असल्याचे सांगत, “निम्मी करून देतो, सर्व टॅक्स नील होईल,” अशी बतावणी केली. यासाठी त्याने 1 लाख 52 हजार रुपये मागितले. त्यानंतर सदर रक्कम रोख स्वरूपात घेतली. यावेळी सोहेल जमादार व त्याचे वडील समीर जमादार उपस्थित होते.

 

दरम्यान, सप्टेंबर 2024 मध्ये सोहेल जमादारने ऑनलाईन टॅक्स कमी झाल्याची बनावट पावती मोबाईलवर दाखवून तिची प्रिंट युनूस खान यांना दिली. मात्र महिनाभरानंतर कर संकलन कार्यालयात चौकशी केली असता, टॅक्स कमी होण्याऐवजी तो वाढून 4 लाख 51 हजार 776 रुपये झाल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी दिलेली पावती बनावट असून चेक बाऊन्स झाल्याने कोणतीही रक्कम भरलेली नसल्याचे सांगितले.

फसवणूक उघड झाल्यानंतर पैसे मागितल्यावर सोहेल जमादारने टाळाटाळ सुरू केली. अखेर बँक ऑफ इंडिया, हडपसर शाखेचा 1 लाख 60 हजारांचा चेक दिला; मात्र तोही खात्यात रक्कम नसल्याने बाऊन्स झाला. नंतर थोडेथोडे करून केवळ 70 हजार रुपये परत केले.

उर्वरित रक्कम मागितल्यावर मात्र प्रकरण गंभीर वळणावर गेले. युनूस खान व त्यांच्या पत्नीला “मी कोण आहे माहित नाही का? माझे पोलिसांशी घनिष्ठ संबंध आहेत. पैसे देणार नाही. परत आलात तर हातपाय तोडीन, खोट्या केसमध्ये अडकवीन,” अशा शब्दांत धमकावण्यात आले. पत्नीसमोर धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून देण्यात आले.

युनूस इकबाल खान हे काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर तासन्‌तास थांबवून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर प्रकरण प्रसारमाध्यमांकडे नेणार असल्याचे सांगितल्यावर गाडीची डिक्की दोन वेळा फोडण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर प्रकारातून महापालिकेच्या नावाखाली दलालांकडून सुरू असलेली फसवणूक, पोलिसी दबावाचा गैरवापर आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post
Ajit Pawar Death: “Maharashtra's great loss due to the death of Ajitdada Pawar” - Krishiraj alias Manoj Chaudhary; “Tribute to late Ajitdada” in Naigaon

Ajit Pawar Death: “अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी” - कृषिराज उर्फ मनोज चौधरी; नायगाव येथे “स्व. अजितदादांना श्रद्धांजली”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp