Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जॉयव्हिले सोसायटीतील व्यक्तीवर पोक्सोसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 March 2026, 13:33
Latur Crime: Touching where it shouldn't be, kissing..; Sexual harassment of 4 minor girls for 11 months, what exactly happened?

Latur Crime

Pune Crime : हडपसर, (पुणे) : पुणे – सोलापूर (Pune Solapur Express) महामार्गावरील कायम चर्चेत असलेल्या शेवाळवाडी (ता. हवेली) येथील जॉयव्हिले सोसायटीत राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीवर मांजरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 03) दुपारी सव्वा एक वाजता घडली.

 

पंकज पोपट ताकवले (वय 36, रा. जॉयव्हिले सोसायटी, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मांजरी पोलीस ठाण्यात पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी धुलीवंदन निमित्ताने अल्पवयीन 13 वर्षांची मुलगी सोसायटीच्या आवारात मैत्रिणींसोबत रंग खेळल्यानंतर परिसरातील एका कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सोसायटीतच राहणारा पंकज ताकवले हा कॅफेमध्ये येऊन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने प्रतिसाद दिला नाही, तरीही आरोपीने तिच्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर मुलगी घरी परतल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचे संशयास्पद वर्तन दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी पंकज ताकवले याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) अंतर्गत कलम 8, 12 लागू करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 सुधारणा 2015 अंतर्गत कलम 3(1)(w)(i) व 3(2)(va) नुसारही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनास्थळी लोणी काळभोर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे (अतिरिक्त कार्यभार मांजरी पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : देऊळगाव गाडा येथे लग्नकार्यात स्टेजवरून खाली उतरण्यावरून वाद, वृद्ध महिलेला मारहाण ; तिघांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Friday, 10 April 2026, 17:09

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदा विभागाचे 15 टक्के कपातीचे आदेश; 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 17:02

सोरतापवाडीत ‘ए.के. वाईन्स’ मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांना रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 16:59

तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची पहिली फायनलिस्ट! पण नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात कोणाचा पत्ता कट होणार? घरात मोठा राडा”

Friday, 10 April 2026, 16:42

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08
Next Post

Pune Metro: पुणे मेट्रो अपडेट! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाबाबत मोठी माहिती समोर; आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.