Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 April 2026, 16:08

Cyber Crime : उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एका 13 वर्षीय मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचे कुटुंब सायबर फसवणुकीपासून थोडक्यात वाचले आहे. 8वीत शिकणाऱ्या तन्मय सक्सेना याने सायबर भामट्यांचा ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव ओळखून आपल्या पालकांची मोठी आर्थिक फसवणूक होण्यापासून रोखली. आरोपींनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवून तन्मयच्या वडिलांना फोन केला होता. तुमच्या फोन नंबरचा वापर दहशतवादी कारवाया आणि 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासाठी झाला आहे, असे सांगून भामट्यांनी पालकांना भीती घातली होती.

तन्मयचे वडील संजय सक्सेना हे बेकरी व्यावसायिक आहेत. आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरच थांबवून ठेवले होते. इतकेच नाही तर त्यांना व्हॉट्सॲपवर एक बनावट अटक वॉरंट देखील पाठवले होते. यामुळे घाबरलेल्या पालकांनी आपल्या बँकेचे सर्व तपशील, घरातील दागिने आणि मालमत्तेची माहिती भामट्यांना दिली होती. मात्र, तन्मयने काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीच्या बातम्या वाचल्या होत्या. जेव्हा समोरच्या व्यक्तीने घरातील मौल्यवान वस्तूंची चौकशी सुरू केली, तेव्हा तन्मयला हा प्रकार फसवणुकीचा असल्याची खात्री पटली.

तन्मयने आपल्या आई-वडिलांना हा फोन कापण्यासाठी वारंवार विनंती केली, पण भीतीमुळे ते ऐकत नव्हते. अखेर तन्मयने एक युक्ती लढवली. त्याने वडिलांना सांगितले की, तुम्ही काही वेळ विश्रांती घेण्यासाठी फोन फक्त ‘फ्लाइट मोड’वर टाका, जेणेकरून कॉल कट होणार नाही. वडिलांनी त्याचे ऐकले आणि जसा फोन फ्लाइट मोडवर गेला, तसा कॉल कट झाला. यानंतर तन्मयने तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुरक्षिततेसाठी सक्सेना यांची बँक खाती काही काळासाठी गोठवली आहेत. बरेलीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तन्मयच्या या जागरूकतेचे मोठे कौतुक केले आहे. वर्तमानपत्रातील माहितीमुळे एका कुटुंबाची मोठी लूट टळली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गांजा आणि अफीमसह चौघे जेरबंद

Tuesday, 16 June 2026, 22:56

जेजुरीत भाविकांचा नंगानाच! दारू पिऊन स्थानिकांना बेदम मारहाण; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

Tuesday, 16 June 2026, 22:33

अश्लील हातवारे अन् छेडछाड! आळंदीत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधमाला नागरिकांनी दिला चोप

Tuesday, 16 June 2026, 22:02

नेत्याच्या फोनवर सायरन वाजला अन् धाबे दणाणले! केंद्र सरकारची ‘अलर्ट सिस्टिम’ तातडीने बंद

Tuesday, 16 June 2026, 21:24

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; पक्षासाठीचे योगदान व निष्ठा पाहून निवड

Tuesday, 16 June 2026, 20:57

“अगं आता आपण लग्न करणार आहे” लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर…

Tuesday, 16 June 2026, 20:32
Next Post

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.