Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील दूध भेसळ रॅकेटचं राजकीय कनेक्शन? मुख्य आरोपी माजी मंत्र्यांचा निकटवर्तीय; राजकीय वर्तुळात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 22:52

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेल्या दूध भेसळ रॅकेटचा तपास आता आणखी पुढे गेला असून, मंचर पोलिसांनी या प्रकरणात आणखी १० जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून भेसळीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ४ जुलै रोजी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भेसळीचे साहित्य घेणाऱ्या आणखी काही व्यक्तींचा शोध घेण्यात आला.

तपासात दूध भेसळीसाठी दूध पावडर, रसायने आणि वास न येणाऱ्या शाम्पूसह विविध पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. नव्याने अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशांत हिंगे याच्याशी नव्याने अटक केलेल्या आरोपींचे संबंध आणि आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत. यासाठी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुशांत हिंगे याला पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडीत घेतले आहे. सुशांत हिंगे आणि नव्याने अटक केलेल्या आरोपींची समोरासमोर चौकशी करून भेसळीसाठी लागणारे साहित्य, पैशांचे व्यवहार आणि संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला जाणार आहे.

 

या प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान ३१ जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे सुशांत हिंगे याच्याशी संबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर सुशांत हिंगे याला न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यात आले.

दरम्यान, सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा पुतण्या असल्याचे सांगण्यात येते. विष्णू हिंगे हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, या दूध भेसळ प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे वळसे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. संबंध आढळल्यास राजकीय आणि सामाजिक जीवनातून निवृत्ती घेण्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली आहे.

दूध भेसळ रॅकेटची व्याप्ती किती आहे आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास मंचर पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

Daily Horoscope: आजवर जे घडलं नाही ते 11 ऑगस्टला घडणार? या राशींच्या आयुष्यात येणार अनपेक्षित वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp