Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केसनंद व कोंढव्यातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 24 November 2026, 12:49

पुणे, ता. 24 : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केसनंद आणि कोंढवा परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विनापरवाना देशी व विदेशी दारू तसेच टँगो पंच देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरोधात पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमवारी (ता. 23) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व पथक वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना केसनंद येथे अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. थेऊर ते केसनंद रस्त्यालगत, आण्णा गार्डन ढाब्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याचे समजले.

पथकाने खात्री करून छापा टाकला असता, दयाशंकर रामविलास तिवारी (वय-47, रा. केसनंद, ता. हवेली) हा विनापरवाना दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडील दारूचा साठा जप्त करून त्याच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पथक कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना जय भोलेनाथ भेळ सेंटर, भैरवनाथ मंदिराजवळ टँगो पंच देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. याच परिसरात कोंढवा पोलिसांचे पथकही गस्त घालत असल्याने दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी अभिषेक सुरेश कुंभार (वय-21, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हा विनापरवाना टँगो पंच देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडील दारूचा साठा जप्त करून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -3 शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक-2 आणि कोंढवा पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

वरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक 02 गुन्हे शाखा जीवन माने यांचे सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, संदिप देवकाते, शरद धांडे, योगेश कुंभार, अख्तर शेख, योगेश माढरे, सुरेखा साबळे, जान्हवी सुर्यवंशी, सुकेशिनी आंबले व अजिंक्य जोजारे अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर व कोढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गावडे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व अमोल हिरवे यांनी केली आहे.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केसनंद व कोंढव्यातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Tuesday, 24 November 2026, 12:49

एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी खुशखबर! NCMC कार्डच्या रिचार्ज नियमांत मोठा बदल; लाखो प्रवाशांना थेट फायदा!

Tuesday, 24 November 2026, 12:29

Daund News : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; 13 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 12:21

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

Tuesday, 24 November 2026, 12:19

मुलीच्या लग्नासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा तगादा! वाघोलीत 22 वर्षांपासून पत्नीचा छळ; जीवे मारण्याचीही दिली धमकी

Tuesday, 24 November 2026, 12:18

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp